काही कारणामुळे मला वाटते की हा लेख वाचायचा राहून गेला, म्हणून उशिरा प्रतिसाद. मी सध्या नियमितपणे मनोगत वाचत असते, पण हा लेख आज सापडला. सध्याचे 'ताजे लेखना' वर टिचकी मारली असता, ताज्या लेखनांच्या यादीमध्ये प्रतिसादही येतात, उदा. जर कोणीतरी लेख, कविता जरी २-३ महिन्यांपूर्वी लिहिले असेल पण त्याला जर कोणीतरी आज प्रतिसाद दिला तर तो लेख आजच्या तारेखेवर दिसतो. प्रशासकांनी यावर काही उपाय सांगितला तर आभारी राहीन.
वेदश्री लेख खूपच छान आहे, मलाही माझ्या आजीच्या गावाची आठवण झाली.
दुपारी खेळायला न जाता बायका पाणी कशा भरतात हेच बघण्यात मी तो अख्खा दिवस घालवला होता आणि दुसऱ्या दिवशी चुकतमाकत का होईना पण आऊ येऊन धडकायच्या आधीच एक कळशी पाण्याने भरून ठेवली होती. तिच्या डोळ्यातलं त्यावेळेसचं कौतुक आठवलं तर आजही अंगावर सुखद रोमांच उभे राहतात.
खूप काही बोलून गेलीस या वाक्यांमधून, अप्रतिम!