अनु

तुमचा भूतलेख, जो तुम्ही तुमच्या भूतकाळातील भुतांबद्दल वर्तमानकाळात लिहीला आहे, उसका जवाब नही! काश वो सारे भूत इस लेख को पढ सकते....

आमच्या लहान पणी एक राजू जोशी नावाचा मित्र होता आमच्या वसाहतीत. तो नेहमी कुठूनतरी भुतांच्या गोष्टी जमवून आणायचा, आणि आम्हाला ए किंवा ई विंगच्या टाकीवर बसून सांगत घाबरवत बसायचा. एकबोटे ह्या एकाच नावाचं भूत असतं हे त्यानेच आम्हांला पटवून दिलं होतं.. पण पुढे वपुंची बदली कथा ऐकली आणि भुताखेतांतला सगळा चार्मच निघून गेला.

पण तुमच्या कडून काही दर्जेदार भूतकथा वाचायला मिळाल्या तर काय बहार येईल! ह्या भूतकथा नजिकच्या भविष्यात ऐकायला मिळतील अशी आशा आहे....