मस्तच रे कविता! साधीच प्रतिमा पण सुंदरतेने सजविलेली.

थोडेसे तुझी हरकत नसल्यास सुचवितो,

३२ मात्रांचे वृत्त आहे, प्रत्येक ८ मात्रानंतर यति जाणवते, कविता वाचताना सुंदर ओघही जाणवतो, पण  दुसऱ्या कडव्यात जरा यतिभंग झाल्यासारखा वाटतो,  .....असे केले तर?

जून पुरेसे, अजून नाही,  ऋतू अजूनी कुठले यावे?

फांदी-फांदी आतुरलेली, अंगोपांगी फुलून यावे!

टाळुन गेला दुरुन श्रावण, ऊन भेटुनी जाळुन गेले,

..................

वर जे लिहिले आहे , ते सुंदर कविता अधिक सुंदर व्हावी ह्या भावनेनी !

-मानस६