गझल तशी छान. शब्दरचनेतली सहजता वाखाणण्याजोगी असली तरी एकंदर प्रकाशनाची घाई झाली असे वाटते. 

२ शेर मला आवडले.

पाहिले जेरीस येणे उत्तरांचे
(प्रश्नही होते तसे भांबावणारे!)
वा! भांबावणारे प्रश्न छान.

होय वेडे,मीच तो प्राजक्त आहे
वेगळे नाही कुणी डोकावणारे!

दुसऱ्या शेरात वरच्या ओळीत होय वेडे, मी तुझा प्राजक्त आहे असे हवे.

मी सुखाला भेटलो नाही कधीही
भेटलेले दु:खही वेडावणारे
हा शेर उत्तम होऊ शकतो. वरची ओळ खालिस्थानी वाटते.

काय? कोऱ्या कागदांनी बंड केला?
(शब्द मागे लागले भंडावणारे)
वरची ओळ फार छान आहे. "बंड केला" हा वापर चुकीचा आहे, असे वाटते. "बंड केले" हवे. खालच्या ओळीत बदल हवा. हा शेर उत्तम होऊ शकतो.

वादळांनो दार का लोटून घेता?
यायचे कोणीतरी ठोठावणारे!
खालच्या ओळीत सुधारणा हवी. कोणीतरी म्हणजे कोणकोण असू शकते याचा विचार केल्यावर कल्पना तोकडी वाटते.

कोंब स्वप्नांचे नव्याने येत गेले
रिक्त डोळे व्हायचे ओलावणारे

विशेषत: दुसऱ्या शेरात महत्त्वाकांक्षी कल्पना आहे. गुंतागुंतीची कल्पना सादर करता-करता तिचा गुंता झाला आहे. कल्पनेतही शब्दरचनेसारखीच सहजता, रेखीवपणा असायला हवा.

नाव माझे टाकले मी, काय झाले?
कोण होते नाव मोठे लावणारे?
ह्मह्म.

पेटणारी लाकडे होती इमानी
रक्त कैसे आमचे थंडावणारे?
ह्मह्म. असे होय.

एकंदर सुधारणेस भरपूर वाव आहे.