वा अनुताई! आणखी एक सुंदर लेख आज आपल्याकडून मिळाला!
वा! काय पत्ता दिलाय! ८८७ मनोगत! सुंदर.
भूत ह्या प्रकरणाशी आपली लहानपणापासून मैत्री दिसते आहे आणि भूत वाटेल त्या भाषेत, प्रदेशात आपल्याला भेटताना दिसते आहे. उलट्या आणि सरळ पायांचा उल्लेखही छान जमला आहे.
भुताबाबत काही प्रश्न - विक्रमाचा मित्र वेताळ हे किती सुंदर भूत आहे नाही? आणि 'तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळण घेतील' - किती गंमतीदार कल्पना आहे नाही? नर्सोबाच्या वाडीत भुताचा वावर जास्त असतो का? भुते साईबाबांना घाबरून पळून जातात का? मेलेल्या माणसाचे भूत होते म्हणतात मग काही माणसे जिवंतपणीच भुतासारखी का वाटू/वागू लागतात?
आपला
(मानगुटीवरचा) प्रवासी