भूताविषयी मी आतापर्यंत ऐकलेल्या काही (हास्यास्पद)गोष्टी:
१. रात्री म्हणजे ब्रह्मप्रहराच्या आधीच भूत दिसते.(ब्रम्हप्रहर पहाटे ३ला सुरु होत असावा असे ऐकले आहे.)
२. गायत्रीमंत्राने भूत पळून जाते.
३. भूताचे पाय उलटे असतात.
४. भूत एकट्यालाच दिसते. (अपवाद: सिनेमातील भूते.शेवटी सर्वाना दिसते.)
५. चक्रीवादळात मीठ टाकल्यास भूत येते.
६. दुबळ्या मनाच्या माणसाला झपाटणे भूत जास्त पसंत करते.
७. मंत्रानी संस्कारीत जपमाळेचा स्पर्श केल्यास भूत नष्ट होते.
८. ड्रॅक्युला पासून रक्षण करण्यासाठी गळ्यात लसूण पाकळ्यांची माळ घालावी.
९. ड्रॅक्युलाला नष्ट करण्यासाठी दिवसा पेरुच्या लाकडाने त्याच्या हृद्यात खोलवर वार करावा आणि लाकूड परत उपटून काढू नये.
१०. डोळे उघडे ठेवून मेलेल्या माणसाचे डोळे नंतर बंद केले नाहीत तर त्याचे भूत उघड्या डोळ्यातून निसटते.  
११. भूताचे प्रतिबिंब आरशात दिसत नाही.