महेश,

वृत्तांच्या उत्क्रांतीसंबंधी आपण जी उपपत्ती मांडली आहे ती मनोरंजक आहे! वृत्तांना नावे कशी दिली गेली यासंबंधीही आपली काही उपपत्ती असेल तर ती जरूर मांडावी!

शाळेत आम्हाला

     मंदाक्रांता, म्हणति तिजला, वृत्त जे मंद चाले

असे सांगितले होते आणि ते बरेचसे पटण्यासारखे आहे. तसेच

    शार्दूलासच कौतुकास्पद गमे, शार्दूलविक्रीडित

हेही संगितले होते. पण शार्दूलाचा किंवा 'शार्दूलत्वा'चा ह्या वृताशी काय संबंध आहे हे मात्र आजतागायत कळलेले नाही!

उपेंद्रवज्रा आणि सुमंदारमाला ह्या अनुक्रमे इंद्रवज्रा आणि मंदारमाला यांच्यात किंचित बदल करून बनतात. त्यामुळे त्यांना ती नावे दिली असावीत. परंतु मुळात इंद्रवज्रा व मंदारमाला कशी आली?

(माझे हे थोडेसे 'काम नाही घरी, सांडून भरी' प्रकारातले आहे. ह्याची मला कल्पना आहे , पण तरीही....)

मीरा फाटक