तुमच्या प्रश्नांची उत्तरे.
मुखवट्यांनी बाहेरून बेगडी होतात. आतून बेगडी कसे?
मुखवट्यांवर मुखवटे घातले आहेत. खऱ्या चेहऱ्यांवर नाही. म्हणजे बेगडीपणावर बेगडीपणाचा थर.कळले नसल्यास समजावून सांगतो.
जसे चोखंदळ हा तुमचा मुखवटा आहे आणि मुखवटा म्हटला की बेगडीपणा आलाच. पण आतूनही तुम्ही एक मुखवटा तुम्ही घातला आहे. तुम्ही आतून-बाहेरून, अंतर्बाह्य बेगडी आहात. खोटारडे आहात. तुमच्यात खरेपणाचा लवलेश नाही.
एक उदाहरण दिले. तुम्ही बेगडी, पोकळ, खोटारडे आहात असे मला बिलकुल सुचवायचे नाही.
अश्रूसुद्धा वृत्तात बसत नाही बुवा.
कसे आणि का बसत नाही ते सांगितले असते तर बरे झाले असते. नेहमीच्या संभाषणात "सुद्धा" या शब्दाचा उच्चार दोन गुरू असणारा किंवा एक लघू, दोन गुरू असणारा सुद्धा आम्ही करू शकतो आणि करतो. हे "मध्ये" सारखेच आहे. ह्या मोकळिकीचा मी फायदा घेतला आहे.
पण ही तुमची असली बुवाबाजी आधी बंद करा बरे. :)
नाव अर्वाच्य असण्याचा ओठ मुके होण्याशी संबंध आपल्याला कळला नाही बुवा.
बुवा, अर्वाच्य या शब्दाचा शब्दश: अर्थही बघा. मग ओठ मुके होण्याशी संबंध आपल्याला कळेल, अशी आशा आहे.
हृदयात स्पंदने ठीक पण श्वास रोखून का पाहतात बुवा?
माझ्या हृदयाची, माझी अशी अवस्था (आनंदातिरेकाची किंवा दु:खातिरेकाची) बघून माझ्या अवतीभवतीची माणसे मला श्वास रोखून पाहताहेत, हा एक अर्थ. आणि माझे श्वास स्वत:ला रोखून मला पाहताहेत, हा दुसरा अर्थ.
हा प्रश्न हे दोन्ही प्रकारचे बघे विचारताहेत किंवा त्यांना असे बघताना बघून मीच हा प्रश्न स्वत:ला विचारतो आहे.
असो. तुमच्या प्रतिसादात काही चांगले प्रश्न असतात पण तुम्हाला चांगल्याला चांगले म्हणता येत नाही काय? स्वत:ला इतका त्रास देणे बरे नाही.
चित्तरंजन