मीराताई,
तुम्ही ती कथा इथे पाठवू शकत असलात तर अवश्य पाठवा.सर्वानाच वाचता येतील.. आमच्या अटी इतक्याही कडक नाहीत हो..आम्ही म्हटले आहे ना, '(इतर पात्रता उक्तृष्ट असल्यास काही बाबींत सवलत देण्यात येईल.)' त्यामुळे त्या कथेचे स्वागत आहे. आणि तुम्हाला आवडली म्हणजे ती नक्कीच चांगली असणार. 'काजळमाया' मधली एकच गोष्ट पुसटशी आठवते विदूषक आणि राजमुकुटासाठी चढाओढ करणारे २ राजकुमार आणि चढाओढीतील विचित्र अडथळे.(नाव आठवत नाही.)'पिंगळावेळ' मी वाचले होते काही वर्षापूर्वी. त्यातली 'स्वामी'(ज्याला मठाची परंपरा म्हणून स्वामी बनवून कायमचे एका तळघरात बंद केले होते.) कथा मला खूप आवडते.
आपली(आतुर)अनु