आपण म्हणता त्यात तथ्य आहे, पण मला वाटते की हिंदी भाषिकांच्या (मराठी भाषिकांच्या हिंदी बोलण्यातला नव्हे) सामान्य व रूढ भाषाव्यवहारातील वापर हा जास्त ग्राह्य धरला पाहिजे.
आपण (न) दिलेले सर्व अर्थ सर्रासपणे रूढ असते तर "बच्चन" यांच्या काव्यपंक्तीत त्यांनी स्वतःचाच उल्लेख या शब्दाने केला नसता. अधिक माहितीसाठीः ती कविता आत्मचरित्रपर आहे, माझे स्मरण धड असेल तर ती "जीवन की आपाधापी में कब वक़्त मिला, कुछ देर कहीं पर बैठ कभी यह सोच सकूं, जो किया कहा माना उसमें क्या बुरा भला ...." अशी काहीतरी सुरू होते. कविता गंभीर आशयाची आहे. त्यात तरुणपणी आपले काय विचार होते व ते किती भाबडे होते या संदर्भात मी दिलेली ओळ आली आहे. कवी शब्दांच्या निवडीबद्दल कसे चोखंदळ असतात हे मी सांगणे नलगे.
एकूण पाहता मूर्ख हाच अर्थ "त्यांच्यात" सामान्यपणे रूढ असावा असे वाटते. एखाद्या अस्सल हिंदीभाषिक मित्रास विचारून पाहिले तर यावर आणखी प्रकाश पडेल. जमेल तसा प्रयत्न करून पाहूया.