खूप, म्हणजे जवळजवळ तेवीसचोवीस, वर्षांपूर्वी किशोर मासिकात ऍलिस इन वंडरलँड, मला वाटते 'पत्तेनगरीत जाई' या नावाने, भाषांतरित चित्रकथामालिकेच्या स्वरूपात येत असे.

त्यानंतर काही वर्षांनी किशोर मासिकात 'द विझर्ड ऑफ ओझ' ही कथासुद्धा भाषांतरित कथामालिकेच्या स्वरूपात येत होती. त्यातील नायिकेचे नाव होते जुई. ('जाई' तशी 'जुई'!) इतर पात्रांची नावेसुद्धा कल्पक होती. जसे 'पत्र्या मारुती', 'नेटकी' वगैरे.

धन्य ते किशोर मासिक! आता आहे की नाही कोणास ठाऊक!

- टग्या.