वेदु, गायत्री मंत्र मुलींनी नीट शिकता म्हणायचा नाही , पण ऐकायचा पण नाही? म्हणणारा नीट म्हणत नसेल तर चुकीचे उच्चार कानावर पडुनही  तू म्हणतेस तोच अनिष्ट  परिणाम होणार नाही का?किती काळ असे घडले तर वाईट परिणाम होतात? विचार आजीला. त्यात तथ्य असावे असे मला वाट्ते कारण गर्भवती स्त्रीने जर ॐ शब्द वेगवेगळ्या प्रकारे म्हटला तर संततीवर त्यानुसार परिणाम होतात असे मी व्यैदकशास्त्र आणि आयुर्वेद दोघांमध्ये वाचले आहे. प्राणायाम, ॐ शब्दातली शक्ती , एकंदरीत उच्चार करण्याच्या प्रकियेत श्वास घेतांना ज्या घडामोडी शरीरात होत असतील त्यावर जर विश्वास असेल तर वरचे उदाहरण पटु शकेल. कारण उच्चारलेले शब्द ही एक प्रकारची उर्जा  असुन लहरी निर्माण करते असे मी मानते पण मी विचारले तसे काळ व मुलीचे  वय याचे पण काहीतरी गणित असावे.