वेदश्री आणी सोनाली,

   आपण छान प्रश्न उपस्थित केला आहे. माझ्या माहिती प्रमाणे गायत्री मंत्र मुलींनी व स्त्रियांनी म्हणायचा नसतो (चु.भु.द्या. घ्या.). कारण फक्त द्विजच (दोनदा जन्मलेला (एकदा मातेच्या गर्भातून आणी दुसर्यांदा मुंज झाल्यावर) ब्राम्हण)याचे पठण करु शकतो.  पण ते सुद्धा  मनातल्या-मनात करायचे असते (मी तरी करतो). याचे नक्की कारण मला माहित नाही. पण गायत्री मंत्राविषयी जेवढी माहिती आहे, तेवढी देत आहे .

गायत्री देवी :-

  हया देवीचे आसन कमळ हे आहे. ती पंचमुखी आहे. तिची पाच मुखे पंचतत्व होत.(प्रुथ्वी,जल,वायू,तेज आणी आकाश).

 

अशा या देवीचा मंत्र उच्चारण सवितेच्या(सुर्य) क्रुपाद्रुष्टी साठी करावा. त्याचा  अर्थ असा आहे.

हे विधात्या,

   तू जीवनदाता आहेस. तू दु:ख विनाशक आहेस. तू सुखकर्ता आहेस.

  हे जगतनिर्मात्या,

    तुझ्या प्रकाशाने आमची सर्व पापे नष्ट होऊ देत.

आता मुद्दा भुताचा

 

   तर लहानपणी मी स्वत: भूते बघितली आहेत. :)

त्याविषयी नंतर लिहीन . आता रात्र झाली आहे. त्यामुळे आता दिवे विझवण्यासाठी पळापळ (अनुने वरती नमुद केल्याप्रमाणे) करावी लागणार आहे. :)

(भूतप्रेमी)ज्ञानेश