कशाबद्दल प्रणाम?

काँग्रेसने जया बच्चनना राज्यसभेतून ज्या कारणासाठी निलंबित करायला लावले, त्याच कारणासाठी आज सोनियांनी राजीनामा दिला आहे. 'लोका सांगे ब्रह्मज्ञान' अशी स्थिती झाली होती काँग्रेसची. हा राजीनामा यांनी पुढचा संघर्ष टाळण्यासाठी दिला, केवळ राजकीय हेतूने, त्यात साध्वी, सती, त्यागी म्हणण्याचे काय कारण आहे? आता रायबरेलीत पुन्हा निवडणुका होणार आणि सोनिया ती निवडणूक लढणारही, अर्थात असे त्यांनीच जाहीर केले आहे, आणि ह्या निवडणूकीचा भुर्दंड बसणार सामान्यांना. केवळ NAC चा राजीनामा देऊन प्रश्न सुटला असता, मग हा राजकीय सावळा गोंधळ करण्याची आणि सरकारी तिजोरीवर भार टाकण्याची गरज काय होती?

त्यांच्या नेमक्या कोणत्या कृत्याने तुम्हाला

> महात्मा गांधी, नेहरू, राजीवजी, संजयजी, इंदिराजी, गौतम बुद्ध, आंबेडकर, फुले, शिवाजी, शहाजी, सावरकर, नेताजी सुभाषचंद्र, विवेकानंद, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, एकनाथ, राणा प्रताप, अकबर, अरविंद, बाबा आमटे, अशोक, चंद्रगुप्त 

ह्या लोकांची आठवण आली ते सांगितले तर बरे होईल.  

टीपः तुमचा चर्चा प्रस्ताव जर "शालजोडीतले" ह्या प्रकारातला असेल तर माझा प्रतिसाद दुर्लक्षित करावा.

मैथिली