वा, म्हणे त्याग केला! खरेच, काँग्रस पक्षातील समस्त नेत्यांचे कर्तृत्व तेजोहीन झाले की काय?( पण तेजोमय कधी होते?..), की त्यांना सोनियाजींच्या नावाच्या आधार घेतल्याशिवाय एक पाऊल ही पुढे टाकता येत नाही, आणि म्हणून की काय त्यांच्या एका राजीनाम्याला सोनेरी त्यागाची झालर वगैरे लावून त्यांच्या नावाचा उदो-उदो चालविला आहे. अरेरे, ह्या लाळघोटेपणाला, कणाहीनतेला, हांजी-हांजी करण्याच्या वृत्तीला काय म्हणावे बरे? मला तर उबग सुद्धा येत नाही अलिकडे!.........अरे ह्यांना कोणीतरी सावरकरांचे चरित्र द्या रे वाचायला !..त्यागाचे 'नोबेल' नसते का हो?..आपण सोनियाजींचे नाव सुचविले असते.

-मानस६