सोनियांनी राजीनामा देऊन बाकीच्यांची भलतीच गोची करून ठेवलीये. मुळात "लाभाचं पद" ही संकल्पना बहुतेकांना पहिल्यांदाच या निमित्तानी समजली.
आम्हाला उत्सुकता आहे ती शेतीतज्ज्ञ बारामतीकरांच्या (ब्रिटिश नंदी झिंदाबाद !) प्रतिक्रियेची ! इतक्या मिनतवारीनं आणि कष्टानं मिळवलेलं अध्यक्षपद...काय टूम काढली मॅडम नी !!! दालमियाला जरा कुठे गप्प बसवतोय तर आता हे खूळ उपटलं का?
बी सी सी आय च्या अध्यक्षपदापेक्षा अधिक "लाभाचं पद" ह्या देशात शोधून सापडेल का मंडळी??? काय करावं बारामतीकरांनी???