राहुल, तुमची या गोष्टीतली लेखनशैली, विषयनिवड वगैरे सर्व गोष्टी अप्रतिम आहेत पण तरीही मी म्हणेन की असं अजिबात लिहित जाऊ नका. सहनच करवत नाही अजिबात. पिलाच्या संरक्षणासाठी आई काय काय करून जाईल हे कोणी कल्पनादेखील करू शकत नाही, हेच खरं ! ती तार त्या आईच्या कपाळात घुसत होती की कथा वाचणाऱ्या माझ्या काळजात, हेच कळेनासं झालं काही क्षण मला.. गोष्ट वाचून डोळ्यात उभं राहिलेलं पाणी काय बोलतंय ते शब्दात मांडायचं कौशल्य नाही माझ्यात.. क्षमस्व.