१) रात्रीच्यावेळी जंगलातला धूर. ( प्रत्येक चित्रपटात, जंगल आणि अगदी झाडेही तिच असतात.)

२) हवेली मधला म्हातारा, क्वचितच बोलणारा, लालटेन घेऊन फिरणारा नोकर.

३) हिरोचा एखादा विनोदी (?) मित्र आणि त्याची गावातली प्रेयसी.

४) अस्वलासारख्या भूताला घाबरविण्यासाठी, क्रॉस किंवा ॐ असतोच. आणि ते दाखविले की भूत सैरभैर होतं !

५) प्रत्येक भुताला स्वतःची अशी एक "हिस्ट्री" असते.

६) भुताच्या तोंडून येणारा हुम्म्म्म हुम्म्म्म्म SSSSS असा आवाज, आणि दोनही हात मिठी मारायला उत्सुक असल्यासारखे असतात !

बाकी रामसेची भूतं हळूहळू का चालतात हा प्रश्न मला फार आधी पासून पडला आहे !

रात हा चित्रपटही रामसेंचाच आहे असे वाटते. ...

सामरीSSSSS !!!
मयुरेश