उंट खड्ड्यात का पडला याची कारणे जाऊद्यात... मुळात उंटांचा कळप पुण्याच्या रस्त्यांत काय करत होता याची कारणे शोधा!

माझी प्रतिक्रिया - अरे अख्खाच्या अख्खा उंट खड्ड्यात कसा पडतो? हा रस्त्यावरचा खड्डा आहे की दरी?? ः-)

माझी प्रतिक्रिया - अरे उंटांचा कळपच्या कळप (संदर्भ: मूळ बातमी) रस्त्यात काय करतो? हे शहर आहे की अभयारण्य?

(आमच्या काळी पुण्यात असे नव्हते हो! फक्त बांधकामावरची/उकिरड्यावरची गाढवे आणि गोठ्यातून मुठेवर धुवायला नेल्या जाणाऱ्या म्हशी, अगदीच झाले तर बेवारशी कुत्रे, एवढेच काय ते प्राणी रस्त्यात समूहाने हिंडताना दिसायचे!)

- टग्या.