आमचे अनुयायीपण अजून संपलेले नाही....
वाचुन संताप, दुःख, कीव, अशा अनेक भावनांनी मनात वादळ निर्माण केले.
अरे, किती दिवस असे अंधानुकरण करत मेंढराच्या कळपाप्रमाणे एकामागे एक क्रमाक्रमाने खड्ड्यात जाऊन पडणार आहात....?
म्हणे अजून कैक शतके ही साध्वी वा तिची अपत्ये आमचे नेतृत्व करोत हीच इच्छा. अरे, त्या अपत्यांची पात्रता नसली तरी चालेल, तरीही त्यांनीच तुमचे नेतृत्व करावे हा तुमचा बालहट्ट्च नव्हे का? कीव करावी वाटते रे तुमच्या निष्ठेची.... अरे मराठी माणुस ना तू? साक्षात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख, मा. बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा उद्धवचे नेतृत्व आमच्यावर लादायचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही उघड उघड त्याचा विरोध करुन सवता डाव मांडला. त्यामागे त्या व्यक्तीची पात्रता हा एकच मुद्दा होता. त्यासाठी आम्ही आमच्या राजाशी विद्रोह केला.. होय विद्रोह केला..........कारण राजकारणेत भावनेला स्थान देऊन चालत नाही . उगाचच याचा त्याचा वारसा मुखोद्गत करुन जमत नाही तर आपल्या कर्तृत्वाने तो अखंड जतन करावा लागतो.