कथा ह्रदयद्रावक आहे. वरकरणी ही कथा प्राण्यांचे हाल दर्शविते. पण खोलवर  विचार केल्यास हे माणसाच्या स्वभावालाही तितकेच लागू पडते. हे पिंजरे आपल्या मनातच आहेत. फरक एवढाच की प्राणी माणसाच्या अत्याचाराचे बळी पडतात पण आपण मात्र स्वतःच आपल्याआपल्यात पिंजरे घालून घेतो.

आजची मिश्र कुटुंब व्यवस्था हे याचे उत्तम उदाहरण ठरू शकेल. आपण राहतो एका घरात पण जणू   काही  प्रत्येकाच्या भोवती एक लोखंडी गजाचा पिंजरा !

कुठे परिस्थिती असे पिंजरे तयार करते तर कुठे स्वभाव. पण कारण काहीही असो गरज आहे ती अशा भिंती तोडून मनं हलकी करण्याची !

तुम्हाला काय वाटतं ?

                                                           --मेघदूत