अमित राव,
सोनिया गांधी ह्यांनी राजीनामा देऊन त्याग केला आहे का ??? ह्या मुद्द्यावर येथे चर्चा आहे.

प्रश्न हा नव्हताच की त्यांनी बरोबर केले की चूक केले-
त्यांनी राजीनामा देऊन बरोबर केले हे मी मान्य करतो परंतू तो त्याग झाला का हा कळीचा मुद्दा आहे.
त्या राजीनामा (नाट्या) नंतर जो काँग्रेसी उर बडवण्याचा संतापजनक 'रोड शो' सुरू आहे व गुरुदास कामत व कृपाशंकर सिंह ह्या चमच्यांनी जे स्वतःचे राजीनामे दिल्लीला धाडलेत (तेही लोकसभा अध्यक्षांना नाही, काँग्रेस अध्यक्षांना ! जेणे करून मॅडम ना कळेल आमची किती निष्ठा आहे व स्वतःचे सदस्यत्व ही अबाधित राहील !) त्यांची कीव करावीशी वाटते.

संघाच्या प्रवक्त्याने स्वतःचे प्रांजळ मत देऊन कोणती घोड चूक केली ते मात्र त्याबद्दलचा हायतोबा माजवणाऱ्या मंडळींकडून कळले तर बरे होईल. 

बाईंनी कावेबाजपणा साधला तर आहेच पण एक चांगली गोष्ट केली व ती म्हणजे काँग्रेस सरकार अध्यादेश आणून (आणीबाणी लादली तसा प्रकार) जो चुकीचा पायंडा पाडू इच्छीत होती त्याला आळा बसवला. अर्थात ह्या गोष्टी साठी त्यांचे कौतुक करावेसे वाटतेच पण अगदी दिवे ओवाळून आरती उतरवण्याइतपत काही महान कार्य केलेले नाही हे ही तितकेच खरे आहे.