१. काय चूक आणि काय बरोबर हे जागा / वेळ / पिढी म्हणजेच व्यक्तिसापेक्ष असते हेच खरे.
सहमत.
२. ऐषाराम हा व्यक्ती सापेक्ष असतो हेही खरे.
सहमत.
३. साहजिकच तसा नैतिक अधिकार असल्यासारखे बोलणाऱ्यांना दुसरी बाजू बघायला फ़ारसे आवडत नाही.
आपण फक्त 'नशेत बरळणाऱ्या' लोकांबद्दल बोलत असाल तर सहमत आहे. 'दारू चढलेल्या' माणसाला नैतिकतेचे भान किती असते असाही प्रश्न मनात येतो.
अन्यथा असहमत.
आपण सदर बाबीचे विस्तृत सामान्यीकरण(ब्रॉड जनरलायझेशन) केले आहे असे वाटते. दुसरी बाजू ऐकून+समजून घेणे हेही व्यक्तिसापेक्ष आहे असे वाटते.
४. प्रत्येक पिढीला आपल्या पुढची पिढी ही वाया गेलेली वाटते.
सहमत.
घरोघरी मातीच्याच चुली. आदिमानवाची पहिली पिढी तीच काय उत्तम होती. बाकी सगळ्या पिढ्या आधीच्या पिढीपेक्षा वाया गेलेल्या.
आपण मुद्दा क्र.२ मध्ये वाहनांचे उदाहरण दिले आहे. तेच उदाहरण पुढे घेतो. आजकाल कॉलेजकुमार-कुमारींना वाहने द्यावी लागतात आणि त्याबद्दल सर्व मध्यमवर्गीय पालकांमध्ये सामान्यतः नाराजीचा सूर दिसतो. आणि 'कॉकुं'च्या मागण्या डावलताना किंवा त्या 'टोन डाऊन' करताना त्यांचे किंवा त्यांच्या आधीच्या पिढीचे दाखले दिले जातात. की आजोबा कसे चालत जायचे आणि आम्ही कसे सायकलवर शहर पालथे घातले इ.इ. पण हे दाखले देताना अनेक गोष्टींना सोयिस्कररीत्या बगल दिली जाते. उदा०
क) आजोबांच्या वेळेस रस्त्यावर किती आणि कशी वाहतूक होती?
ख) आजोबा एका दिवसात किती कामे पार पाडू शकत?
ग) आजोबांच्या वेळेस शैक्षणिक स्पर्धा किती होती? (सातवी किंवा व्ह.फा. होऊन 'भागत' असे.)
घ) आजोबांच्या वेळेस कामाची/नातेवाईकांची/बाजाराची/धंद्याची ठिकाणे घरापासून किती जवळ/लांब होती?
च) इ.इ.
लैंगिकता ही अस्पृश्य वाटावी अशी शिकवण.
सहमत.
मी आधी इतरत्र 'मनोगत'वर मांडल्याप्रमाणे-
'आपल्या लोकांना लैंगिकतेबद्दल बोलणे जड जाते. आपल्या लग्न झालेल्या पुत्राशी निरोध, कामजीवन किंवा तत्सम गोष्टी बोलण्यासाठीसुद्धा पित्याला अवघड/अशक्य ठरते.'
खजुराहो चे उदाहरण असूनही त्याबद्दल अभिमान नाही. याउलट लैंगिकता म्हणजे पाश्चात्यांची देणगी.
तेच कामसूत्रांबाबत.
कधीतरी आपण हे मान्य करू शकू का की लैंगिकता आणि तिचे काही प्रमाणात प्रदर्शन हे तरुणाईसाठी नैसर्गिक आहे.कदाचित हो, पण कधी ते माहीत नाही. मान्य केले तरी ते अपरिहार्यता किंवा सामाजिक संवेदना बोथट झाल्या म्हणून असेल, परिस्थिती समजून नसेल असे वाटते.
संस्कृतीदेखील काळ व व्यक्ती सापेक्ष असते का?
सहमत.