किंबहुना काळे किंवा पांढरे रंगविण्याचा प्रयत्न नाही याचमुळे महाभारत अधिक सुंदर, जीवनपयोगी आणि वास्तव वाटते. सर्व पात्रे (किंवा इतिहासकालीन व्यक्ती... जसे म्हणाल तसे!) उत्तुंग आहेत हे मात्र खरे.
इरावती कर्वे यांनी महाभारतातील पात्रांचे केलेले सुंदर विश्लेषण आणि गुणवर्णन अजूनही संस्कारपटलावर आहे. (पुस्तकाचे नाव विसरलो.) तर दुसऱ्या टोकाला "हा जय नावाचा इतिहास आहे" हे पांडवांच्या -- विशेषतः धर्माच्या -- थोरपणावर सडकून आणि मुद्देसूद टीका करणारे पुस्तकही स्मरणात आहे. कोणतीही गोष्ट फक्त परंपरा म्हणून स्वीकारू नकोस असा संस्कार नकळत त्या वाचनातून झाला असावा. (लेखकाचे नाव विसरलो.)
जाणकारांनी दिलेले तपशील खुशाल पूर्ण अथवा दुरुस्त करावेत.
महाभारत भोगलेला ... एकलव्य