मिलिंद

जर एखादी गोष्ट दुसर्‍याप्रमाणे करून स्वत:ला आणि दुसर्‍यांना पण आनंद मिळत असेल, तर त्याला चौर्य का आणि कसं म्हणणार? आपण केलेलं अनुकरण आम्हांला तरी आनंददायीच आहे, तेव्हा असा किंतु मनात आणू नका. शिवाय अहो कोण अनुसरण करतं आहे हा निकष पण आहेच कि. तुम्ही, सुभाषराव इ. मातब्बर मंडळींनी जर सुरेश भट वगैरेंच्या कामाचं अनुसरण केलं तर ती गुरुदक्षिणा वाटत असेल त्यांनाही. नाहीतर असं (दु:)साहस आमच्यासारख्यांनी केलं तर त्याला मात्र चौर्य म्हणायला लागेल, कारण त्यात नाविन्याचा अभाव असेल - वृत्तात, छंदात आणि आशयात पण.

तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे दाटून कंठ येतो, केव्हातरी पहाटे आणि ही वाट दूर जाते ही तिन्ही गाणी वेगळ्या जातीतली असल्यामुळे(आशयाच्या दृष्टीने) गेयतेच्या दृष्टीनं तिन्ही संगीतकारांनी वेगवेगळ्या बांधणीत बांधली ही गाणी. अशी बरीचशी उदाहरणे आहेत एकाच छंदातील विविध भावगीतं वेगवेगळ्या सुरावटीत बांधल्याची. माझ्या मते ही वाट दूर जाते सगळ्यात आधी आलं - मग बहुधा दाटून कंठ येतो आणि मग केव्हातरी पहाटे. चू. भू. द्या. घ्या.