'काय मनोगतावर पडीक बसलेला असतोस सारखा उठ कामधंद्याला लाग' असे माझा मोठा भाऊ जयंता मला सारखा सांगतो व मी उठलो की स्वतः मनोगतावर चक्कर टाकतो. त्याचा आयडी मलाही त्याने कळु दिलेला नाही. मीच मुर्ख आहे, खऱ्या नावाने आयडी उघडला. आता पश्चात्ताप होतो आहे. 

मी काल एका सिनेमाला गेलो होतो त्यात शिल्पा शेट्टी इत्के घाणेरडे कपडे घालून मिरवत होती की काहीच विचारू नका. ते बघुन मला वाटायला लागले की आमच्यावर कुसंस्कार करणारे खरे कोण ? माझ्या बाजुचा म्हातारा बोळ्क हल्वत व मिटक्या मारीत शेट्टीण बाईंकडे टक लावून बघत होता.

नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार भार्ताने इंग्लंडचा ३९ धावांनी पराभव केल्याचे कळले. सरदार हरभजन ने पांच विकेट घेतल्या तर ३७ धावा ठोकल्या मग सरदारजीला मॅन ऑफ द मॅच नाही मिळणार तर कोणाला मिळणार पण भारताची टिम भारतातही फारच बेक्कार खेळ्ते नाही का ?

हे असंबद्ध बडबड करण्याचे ठिकाण नाही हे कळ्तय मला पण काय करणार रोज काही ना काही प्रतिसाद टाकल्याशिवाय मी जेव्लेले मला पचतच नाही मग उपाय काय तर मनोगतावर यावे कवितेत्ले कळत नस्ले तरी कवीची वाहवा करावी, गज़लेत्ले कळत नस्ले तरी 'क्या बात है' चा सुर जुळवावा व उगीचच मी खुप हुशार अस्ल्याचे दाख्वुन द्यावे.

जय हिंद जय महाराष्ट्र