मनकवडा, आपले मुद्दे हे बऱ्याच अंशी मान्य आहेत.
मनोगतींच्या इंग्लंडबद्दलचा प्रतिसादाबद्दल लिहावेसे वाटले. ईग्लंडमधे वाढलेल्या एका मुलीला हा अधिकार नक्कीच मिळावा. आपण म्हणता त्याप्रमाणे "टीनेज प्रेग्नंन्सी" चे प्रमाण युरोप मध्ये अधिक आहे हे खरे परंतु युरोप मध्ये लैंगिक मुक्तता ही इंग्लंडच्या पेक्षा भरपूर जास्त आहे हेही तितकेच खरे.
सांस्कृतिक व धार्मिक कारणांमुळे लैंगिकतेवर निर्बंध घालण्यात आले. हिंदू, रोमन कॅथलिक, ज्युडाईझम, चर्च ऑफ इंग्लंड याबद्दल मला जी तुटपुंजी माहिती आहे त्यानुसार या धर्मात , धार्मिक नेत्यांनी स्वार्थासाठी व स्वतःची किंमत वाढविण्यासाठी वेगवेगळ्या वेळी नियम केलेत/लादलेत. असे करण्यात खरे यश इस्लाम च्या नेत्यांना आलेत म्हणून आपल्याला इस्लाममधील व्यक्तिस्वातंत्र्याची (स्त्रीची) परवड स्वच्छ दिसते. तेंव्हा धार्मिक पगडा कमी झाला की व्यक्तिस्वातंत्र्य वाढते, काय योग्य व काय अयोग्य हा भिन्न मुद्दा. (अमेरिका ही इग्लंडपेक्षा धार्मिक आहे हे सांगणे न लगे)
बाकी मनकवडा यांच्याशी सहमत.
स्निग्धा परांजपे-रिचर्डसन.