मिलिंद,
आपल्या महाभारताविषयीच्या शंका रास्त आहेत. जाणकारांची मते ऐकण्यास आनंद वाटेल. त्याचबरोबर एकनाथ फडके यांनी म्हटल्याप्रमाणे महाभारत हे काळ्या पांढऱ्या रंगात नसून 'ग्रे' शेड मध्ये आहे, हे ही मान्य.
परंतु मग माझ्या मनात शंका येते, रामायणाचे काय? रामायण हे नेहमीच काळ्या पांढऱ्या रंगा मध्ये रंगवले जाते. प्रभू रामचंद्र हे अवघ्या भारताचे आदर्श व्यक्तिमत्त्व मानले जाते. परंतू आदर्श राजा रामचंद्रांनी बाजार गप्पांवर विश्वास ठेवून आपल्या पत्नीवर संशय घेणे कितपत योग्य आहे? ज्या सीता माईने सगळ्या सुखांचा त्याग करून आपल्या पतीसोबत वनवास सहन केला, त्या आपल्या पत्नीला पुन्हा वनवासात पाठवण्याचा निर्णय प्रभू राम कसे काय घेऊ शकले? माझ्या मनातही शंका फार पूर्वी पासून होती. कृपया जाणकारांनी खुलासा करावा.
वरुण.