रामायणातील शंकांचे निरसन होण्यासाठी आबाजी जाधव, कोल्हापूर लिखित 'रामायणावर नवा प्रकाश' हे पुस्तक जरूर वाचावे. पुस्तक दुर्मिळ आहे, मात्र ग्रंथालयात मिळू शकेल. रामाला एक सर्वसामान्य व्यक्ती मानून त्यावर रामायणाची मीमांसा ह्या पुस्तकात बेतलेली आहे. रामायणातील विसंगती दाखवून रामायण हा इतिहास नाही तर वाल्मिकींनी नारदाकडून मिळालेल्या कथाबीजाचा स्वकल्पनाशक्तीचा वापर करून केलेला विस्तार आहे असे ह्या पुस्तकात म्हटले आहे. तसेच नारदाने वाल्मिकीस पुरवलेले कथाबीज हे इजिप्त मधील रामसेस राजाबद्दलचे असावे असा तर्क मांडून त्यापुष्ट्यर्थ पुरावे देण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकात केलेला आहे.