लाक्षागृहात खून- लाक्षागृहात सापडलेली प्रेते ही जळण्यापूर्वीच मृत व्यक्ती होत्या. त्यामुळे त्यांच्या खुनाचा प्रश्नच उद्भवत नाही.
-नाही माधवराव.आपला प्रतिसाद अल्यानंतर मी पुन्हा खात्री करून घेतली.ती निषादी आणि तिचे पाच पुत्र जिवंत होते.त्यांना कुंतीने व पांडवांने दारू पाजून बेशुद्ध केले आणि मग लाक्षागृह पेटवून निघून गेले.
जयद्रथवधाचीच प्रतिज्ञा का?- अभिमन्यूला
फक्त कपटानेच मारले गेले नव्हते तर त्याच्या कलेवराचेही धिंडवडे काढण्यात
आल्याचे काही ठिकाणी वाचल्याचे स्मरते कदाचित अर्जुनाने त्यासाठीच इतकी
उग्र प्रतिज्ञा केली असावी.
-हे धिंडवडे जयद्रथाने काढले होते का? तसे असल्यास प्रतिज्ञा एक वेळ समजण्यासारखी आहे.पण तसे नसल्यास मूळ प्रश्न उरतोच. जयद्रथवधाचीच प्रतिज्ञा का?अधर्माने त्याला मारणाऱ्या द्रोण, कृप, कर्ण, कृतवर्मा,अश्वत्थामा व दुःशासनपुत्र सोडून जयद्रथावर का राग काढावा?