फडके साहेब,
तुमचे म्हणणे बरोबर आहे.
माझ्यामते, महाभारतात कोणत्याही व्यक्तीला काळ्या किंवा पांढऱ्या रंगात
बघता येत नाही. त्यामधला करडा (ग्रे) रंग वापरावा लागतो. काही पात्रे
काळ्याकडे झुकणारी करडी तर काही पांढऱ्याकडे झुकणारी करडी, इतकाच काय तो
फरक.
ह्यात वादच नाही.परंतु ह्याने प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. इतिहास असो वा कादंबरी, पात्रे त्या त्या क्षणी तशी का वागली ह्याचे काहीतरी कारण असावे लागते.त्या पात्राची ती विशिष्ट कृती करण्यामागची भूमिका काय,कारणमिमांसा काय हे समजून घ्यायला हवे.केवळ व्यक्ती/पात्र करड्या छटेत रंगवले आहे हे स्पष्टीकरण पुरेसे नाही. ते पुरेसे मानले तर आपण कोणाच्याही वागण्याचे मनोविश्लेषण करू शकणार नाही की कोणत्याही कथा/कादंबरीची समीक्षा/टीका करू शकणार नाही. साऱ्या प्रश्नांचे उत्तर एकच येईल - करडा रंग.
चू. भू.दे. घे.