वरूण,

मी जाणकार नाही, तरी खुलासा करण्याचे धारीष्ट करतोय. कृपया समजून घ्यावे.

स्त्री बद्दलची बदलती भावना रामायणाच्या शेवटापासून ते महाभारतापर्यंत प्रतिबिंबित होताना दिसते.

सीतेला द्यावी लागलेली अग्निपरीक्षा ही त्याची सुरवात म्हणता येईल. द्रौपदीला द्यावी लागलेली परीक्षा तर त्याहून कितीतरी भयंकर होती.

या काळामधली स्त्री व्यक्तीमत्वे बघितली (उदा. अंबा-अंबालिकापासून कुंती, माद्री, देवकी, यशोदा, गांधारी व नंतर दुर्योधनाची पत्नी भानुमती आणि द्रौपदी...)

 परंतु ''नियतीचे भोग" भोगून सुध्दा सीतेची रामभक्ती आणि द्रौपदीची कृष्णभक्ती जराही कमी झाली नाही. याचे कारण काय असावे?

याचाच मला वाटणारा अर्थ असा की रामायण हे रामाच्या दृष्टिकोनातून लिहिले गेले आहे तर महाभारत कृष्णाच्या.

म्हणजे कवीने त्या कथेमध्ये अनेक पात्रे रंगवली असली तरी त्याचा दृष्टिकोन 'biased' आहे.

                                                           --मेघदूत