विषाचे घोट घ्यावे केतकीने पन्नगासाठी
नगाचे शीर्ष वाकावे कुण्या जख्मी खगासाठी
तसे आयुष्य वेचावे किती ह्यांनी दुज्यासाठी?
वसंताने फुलासाठी व संताने जगासाठी

टीकाराम