उतारा छान आहे. धन्यवाद.
पण आता जग फार वेगाने बदलले आहे, बदलते आहे. नव्या युगाला लागू होणार नाही. कुटुंबसंस्था, धार्मिक मान्यता वगैरे वगैरे गोष्टी अंतर्बाह्य बदलताहेत.
राष्ट्रीय सद्गुण किंवा नॅशनल कॅरक्टर ही गोष्टच आता कालबाह्य होणार आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. तसे व्हावे.
राष्ट्रवादाचे राजकारण (नॅशनलिज़्म) हे भावनेवर आधारित(इमोटिव) राजकारण आहे. त्याचा मुळाशी राष्ट्रीय सद्गुणांचा उदोउदो आहे. त्याला जादा खतपाणी घातले की भस्मासुरांचा उदय होतो, असे मला वाटते.
इंडिविज्युलिज़्म आणि ह्युमनिज़्म ह्या युरोपीय रिनेसन्सच्या(कॉन्स्टंटिनोपलच्या पाडावानंतर रिनेसन्सचा काळ सुरू होतो) दोन देणग्या होत्या. त्या आम्ही आता खऱ्या अर्थाने स्वीकारतो आहे. म्हणजे दुसऱ्यां शब्दांत एका अर्थाने कुटुंबसंस्था नाकारून व्यक्तिकेंद्रित होतो आहोत आणि माणूस काहीही करू शकतो यावर आमचा आत्ता कुठे विश्वास बसायला लागला आहे.
राजा राममोहन रॉय यांच्या काळातला आमचा रिनेसन्स हा काही मूठभर लोकांपुरता मर्यादित होता.
तूर्तास एवढेच.