मिलिंदराव,
अप्रतिम गझल. प्रत्येक शेराला दाद द्यावीशी वाटते आहे.
मी रिता कधीचा पेला घेउन बसलो
तू नजर फिरवली, सागर हरवुन बसलो
- वा! उर्दू 'साग़र - मद्यप्याला' या अर्थानंही आवडला.
देवळात गेलो भांडाया ज्याच्याशी
मी टिळा कपाळी त्याचा लावुन बसलो
- वा! कमल हसनच्या 'हे राम' या चित्रपटात गांधीवधासाठी गेलेल्या नायकाला झालेली उपरती आठवली.

सोबतीस माझ्या नव्हते जेव्हा कोणी
मी नकार सारे सोबत घेउन बसलो
- वा! नेहमीचा विषय; पण मांडणी आवडली, विशेषतः 'नकार' हा शब्दप्रयोग.

कोणतेच ओझे पेलू शकलो नाही
रेशमी करांना बेड्या ठरवुन बसलो
- वा! रोजच्या धकाधकीच्या जीवनात असं व्हायचंच.

राहिले पटावर प्यादी, घोडे, हत्ती
जिंकला डाव पण राणी गमवुन बसलो
- वा! प्यादी, घोडे, हत्ती नसते तर क्यारमचा खेळही वाटू शकला असता...ह. घ्या.

विसरलो कसा, वय नाही शृंगाराचे
पेटलो असा की खांडव होउन बसलो
 वा! वेगळी कल्पना.
मोडक्या घराचे ओझे झाले थोडे
वर जगास साऱ्या घरकुल समजुन बसलो
सुंदर .....
आकड्यात मोजे दुनिया कर्तृत्वाला
मी भणंग केवळ कवने जमवुन बसलो
नारायण सुर्व्यांची 'कवितेऐवजी रद्दी विकली असती तर...' ही कविता आठवली.
- कुमार