एकूणच आपला बांगलादेश या विषयावर दांडगा अभ्यास आहे असे दिसते. शक्य झाल्यास मुक्तो-मना या बांगलादेशाशी निगडीत संकेतस्थळालाही भेट द्यावी.

प्रश्न भारतीयांचा आहे. बांगला देशीयांच्या पुळक्याचा वा द्वेषाचा (जो आपला आवडता विषय दिसतो) मुळीच नाही.

अवांतर- बांगलादेशात मराठी इतक्या मोठ्या प्रमाणावर बोलली जाते असे जे आपले गृहीतक आहे त्यात फारसा दम दिसत नाही. ही आरोळी आपणच बनवली आहे असा एक कयास आहे. आपल्या खात्रीशीर माहितीच्या स्रोतांची अपेक्षा आहे.

जाता जाता - मशीदीवरील भोंग्याचा होणारा त्रास हा समाजात दुही माजवण्या इतका मोठा मुद्दा आहे? का हा आपल्या मानसिकतेचे प्रतीक आहे?