महाभारत वरवर वाचून समजणे अवघडच आहे.ते समजून घेण्यासाठी त्यातील कालाचा आणि त्या कालातील नीतिकल्पनान्चा विचार करणे आवश्यक आहे.आजच्या कालाच्या नीतिमूल्यान्ची कसोटी लावल्यामुळे घोटाळे होतात.उदा.देवकीचा आठवा पुत्र कन्सास ठार मारणार हे कळल्यावर तो देवकीला ठार मारायला निघाला पण वसुदेवाच्या विनन्ती वरून त्याने त्या दोघाना तुरुन्गात टाकले.त्याना जर एकत्रच ठेवले नसते तर त्याना मूल होण्याची शक्यताच नव्हती येवढी साधी गोष्ट कन्साच्या लक्शात आली नसेल असे वाटत नाही,पण त्या काळच्या नीतिकल्पनात ते बसत नसावे.ग़ीतेतील महत्वाचे तत्व प्रत्येक पात्रास लावल्यास घोटाळेकमी होतात,ते तत्व स्वधर्मे निधनम श्रेयः-----