विनायकरावांशी सहमत...

दुसऱ्याच्या काठीने गाय मारण्याच्या कोल्हटकरांच्या प्रयत्नाने दुबळेपणाची धडपड आणखीच उघडी पडते. काही विद्वानांच्या संदर्भाने त्यांनी हे भाष्य केले. ज्याअर्थी ते खोडून काढलेले नाही म्हणजे त्यांनी दुजोरा दिल्यासारखे होते.

शिवाजी महाराजांच्या महत्वाकांक्षेविषयी मी काही लिहावे याची बिलकूल गरज नाही. शिवाजी महाराजांविषयी नरहर कुरुंदकरांनी "जनतेचे राज्य" या संदर्भातील लेख अनेकांनी वाचला असेल. कोल्हटकरांनी अचूकपणे दाखविलेले अनेक राष्ट्रदोष समर्थ नेतृत्व कसे नाहीसे करते याचेच ते दर्शन आहे. बऱ्याचदा आधुनिक (लोकशाही/ नानाविध वाद) राजकीय द्रष्टेपणाच्या कसोटया इतिहासकाळातील व्यक्तींना लावल्या जातात. संपूर्ण समाजाची युगानुयुगांची मानसिकता बदलविणारा हा जाणता राजा त्यावरही उतरतो.

विनायकरावांच्या पेशव्यांच्या महत्वाकांक्षेविषयीचे उद्गार मात्र sweeping generalization वाटतात. पेशव्यांच्या अधोगतीची कारणे अक्षम्य आहेत... त्याचे समर्थन नाहीच. बाजीरावाने शिवराज्यातून मराठा साम्राज्य उभे करण्याचे स्वप्न पाहिले/साकारले...भाउंनी दिल्लीचे तख्त फोडले. पानिपतावर महासेना लढली ती मोठी स्वप्ने पाहिली म्हणूनच. चौथाई, आणि बादशाहाशी असलेले संबंध यांचा संदर्भ लावून हे दिल्लीपतींचे अंकित होण्याचेच स्वप्न बाळगले असे म्हणणे हे बादरायण संबंधांसारखे होते. ... अगदी पेशवाईच्या अखेरीच्या काळात देखील.

कोल्हटकरांनी पेशव्यांच्या बाबतीत अजूनतरी मौन बाळगले आहे हे खरे. (उरलेल्या लेखात असेलही हा संशयाचा फायदा!) त्यांच्या सोईस्करपणाचा संशय येणे मात्र अगदी स्वाभाविक आहे.