कोल्हटकरांच्या या लेखाच्या निमित्ताने नव्वदीतल्या एका गृहस्थांशी चर्चा झाली. ते म्हणाले त्याचा सारांश साधारण असा होता -
इंग्रजी भाषा व त्यातून मिळणाऱ्या ज्ञानाच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली काही मूर्ख माणसे त्या काळी होती. कोल्हटकर हे त्यातलेच एक. त्यांच्या बडबडीकडे त्या काळीही फारसे कोणी लक्ष दिले नाही. इंग्रजांचे सरकार होते त्यामुळे प्रभावित होऊन आणि घाबरूनही लेखन केले जात असे. कोल्हटकर हे विनोदी लेखक म्हणून मात्र नावाजले गेले होते.