यीस्टची दोन द्रावणं करायची नसून नारळाच्या दुधातील एकच द्रावण बनवायचे आहे. पाककृती लिहीताना, आधी मी पाण्यातील द्रावण बनविण्याविषयी लिहीले होते परंतु नंतर, यीस्ट पाण्यात न घालता नारळाच्या दुधात घालायचे आहे, हे लक्षात आले, त्यामुळे तसे लिहीले परंतु आधीचे लेखन (पाण्यात यीस्ट बनवायचे हे) खोडायचे राहून गेले. आता ते वाक्य काढून टाकण्याविषयी श्री. प्रशासकांना कळविले आहे. संभ्रमास कारणीभूत झाल्याबद्दल क्षमस्व.
नारळाच्या कोमट दुधात अर्धा चमचा यीस्ट घालून एकच द्रावण बनवावे. १५ मिनिटांनंतर फसफसले की वाटून झालेल्या तांदूळात ते मिसळायचे. (वाटताना नाही.)