विलास,
   निरूपण छान लिहिले आहात. नेहमीपेक्षा मोठे झाले आहे, पहिल्या अभंगातील परिच्छेदाची पुनरावृत्ती टाळली असती तरी चालले असते. अभंगात नेहमीपेक्षा २ ओळी अधिक असल्यामुळे निरूपणाची लांबी वाढली असावी.

हरिपाठातील २७ ही अभंगांचे निरूपण अगदी नित्यनेमाने दर बुधवारी प्रकाशित केल्याबद्दल अभिनंदन. मनोगतावर पुस्तकरूपात संपूर्ण उपलब्ध असे हे प्रथम अध्यात्मिक लिखाण असावे. इतर पुस्तकेही लवकरात लवकर पूर्ण होतीलच.

धन्यवाद.

श्रावणी