गमभन टंकलेखन सुविधेत गुजराथी लिपी समाविष्ट केली आहे. तसेच रुपरंगात काही बदल केले आहेत.
माझ्या गुजराथी लिपीच्या जुजबी ओळखीनुसार व युनिकोडच्या वर्णतक्त्याच्या अतिशय उत्तम अशा मांडणीमुळे माझे काम सोपे झाले. तरी गुजराथी जाणणाऱ्या सदस्यांनी या सुविधेचा वापर करून काही चुका असल्यास त्या दाखवून द्याव्यात, तसेच काही नव्या कल्पना असल्या तर त्याही सांगाव्यात.
नवे बदल 'गमभन' इथून उतरवून घ्यावेत.