अत्यंत कनिष्ठ प्रतीच्या मजुरापासून तो वरिष्ठ हिंदी अंमलदारापर्यंत आपण दृष्टी फेकली, तर मनास समाधान व अभिमान वाटण्यासारखी जाज्वल्य सत्यनिष्ठा आपणास किती ठिकाणी दिसेल बरे? आपण बाजारात भाजी विकत घ्यावयास गेलो, तर आपणास किती वेळ घासाघीस करावी लागते? स्टेशनवरील तिकिटे विकणारा अडाणी प्रवाशांपासून किती पैसे लुबाडीत असतो? व्यापाऱ्यांचे मुनीम नुकसानीचे सौदे मालकांच्या व फायद्याचे सौदे स्वतःच्या नावावर दाखवून किती पैसा गिळंकृत करीत असतात? गिऱ्हाईकाकडे माल विकावयास गेला असता तोलताना व त्याचा हिशेब करताना गिऱ्हाईक व मध्यस्थ किती गैरवाजवी नफा आपल्या घशात टाकीत असतात? कामावर मजूर ठेवून त्याजवर देखरेख न ठेवली, तर किती नुकसान सोसावे लागते? न्यायदेवतेच्या मंदिरात किती पत्रकार, वकील व साक्षीदार न्यायाधीशाच्या डोळ्यांत धूळ फेकीत असतात? त्याच क्षणी तेच न्यायाधीश लाच खाऊन न्यायाचा कसा राजरोस खून करीत असतात?
हे काही अंशी आजही लागू पडते असे वाटते.
आपणास कोणी लबाड म्हटले असता आपणापैकी अनेकांस लाज वाटण्याऐवजी धन्यता वाटते की नाही?
असहमत.