पनीर म्हशीच्या दुधाचेही करतात. पुलाव, बिर्याणी, ग्रेव्हीचे पदार्थ, पालक पनीर, पनीर टिक्का वगैरेत म्हशीच्या दुधाचे पनीर वापरतात. हे पनीर घट्ट असते. म्हशीच्या दुधात स्निग्धांश जास्त असल्याकारणाने पनीर घट्ट होते.
रसगुल्ला, रसमलाई आदी मिठायांमध्ये पनीर मऊ आणि सच्छिद्र हवे असते. ते गायीच्या दुधात स्निग्धांश कमी असल्यामुळे शक्य होते. माझ्या माहितीत, रसगुल्ले अधिक चांगले होण्यासाठी गायीच्या दुधात असणारा अल्प स्निग्धांशही काढून टाकतात.
त्याची कृती अशीः-
गायीचे दूध भरपूर तापवून थंड करावे. थंड झाले की रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून द्यावे. दुसऱ्या दिवशी त्यावर जमा झालेली साय काढून टाकावी. आता, हे (साय काढलेले) दूध तापवून त्याचे पनीर बनवावे.
स्निग्धांश काढल्यामुळे हे पनीर पचायलाही हलके होते.