कोल्हटकरांनी इंग्रजांचे केवळ उदाहरण देऊन ते आपल्यावर राज्य का करू शकले, आपल्याहून प्रगत समाज कसा बनवू शकले याबद्दल दाखले दिले आहेत. भारतीय त्यांहून अधिक की कमी सत्यनिष्ठ आहेत हा मुद्दा नसून भारतीय सत्यनिष्ठ आहेत की नाही हा मुद्दा आहे. ज्या देशाचा भ्रष्टाचारात अत्यंत वरचा क्रमांक लागतो (बांग्लादेश नायजेरिया सारखे मोजके प्रतिस्पर्धी आहेत म्हणा!) त्या लोकांनी 'इंग्लीश लोक प्रमाणिक आहेत' हाच महत्वाचा मुद्दा समजून त्यावर लक्ष केंद्रित करणे याचा अर्थ काय असावा?
स्वतः लेखकानेही ही इंग्रजांच्या सत्यप्रियतेची सारी उदाहरणे अतिशयोक्तिपूर्ण असण्याची शक्यता नाकारलेलीच नाही.
आपल्याला भारतीय 'सत्यनिष्ठ' आहेत याची खात्री आहे असे दिसते. आपण निवडून दिलेले प्रतिनिधी, लाच खाणारे सरकारी अधिकारी, वृतांचा विपर्यास करणारी वृत्तपत्रे या साऱ्यांत जाज्वल्य सत्यनिष्ठा दिसते असे दिसते.
त्याच्या जो आजवरचा कामाचा अनुभव आहेत त्यात भारतीय माणूस प्रामाणिक असतो असे म्हणायला पोषक आकडेवारी दिसत नाही. दुराभिमानी मात्र नक्कीच आहे.
कोल्हटकरांबद्दल थोडीशी अधिक माहिती घेतली तर उपहासात्मक लिखाण हा त्यांचा हातखंडा कसा होता याची आपल्याला माहिती मिळेत. त्यांच्या या लेखाने आपणांस आत्मपरीक्षण करावेसे न वाटता लेखकाचा मूर्खपणा सिद्ध करण्याची गरज वाटते ही कमाल आहे.
एकूण भारतीयांच्या सत्यनिष्ठेचे व्यावहारिक दाखले आपण दिल्यास वाचायला नक्कीच आवडेल.