कोल्हटकरांना त्या काळातील जनतेचा या संग्रामातील सहभाग कोणत्या कारणांसाठी होता हे सांगावयाचे आहे असे (स्पष्ट) दिसते. नेत्यांना अपेक्षित गोष्टी आपल्याच शब्दात आजचा इतिहास वाचून शेंबड्या पोरांनाही ठावूक असाव्यात.

आजही विकासा सारख्या शेंबड्या पोराला कळणे अपेक्षित असलेल्या गोष्टींकडे दूर्लक्ष करून धर्म/जाती अश्या नगण्य गोष्टींवरून राजकारणाची दिशा ठरते. आपली अर्थशास्त्रतज्ज्ञ शेंबडी पोरे यावेळी मतदान करू शकत नाहीत हे मान्य. पण या साध्या गोष्टी जनतेला उमजू नयेत? अज्ञान आहे ना? मग त्या काळची जनता एवढी प्रगल्भ होती?

कोल्हटकरांना त्या चळवळीला निव्वळ स्वतंत्र्यप्रेमाबरोबरच तर भावनांचा ही आधार दिला असल्याने या पोकळ पायावर उभारलेली स्वातंत्र्यसमराची मिनार फार काळ उभी राहू शकणार नाही असे म्हणायचे असावे. जी उभारणे व त्यासाठी प्रयत्न करणे ही साहित्यिकांची जबाबदारी आहे असे वाटल्यानेच त्यांनी नाटकांच्या टिकालेखात या विषयावर लिहीण्याचे योजले असावे.

त्यांचा हा लेख इतिहास वा समाजकारण या विषयावर नाही हे आपण सोयिस्करपणे विसरू पाहत आहात असे वाटते.

कोल्हटकरांचे देशहितासाठी रचनात्मक योगदान काय हे मज पामरास समजावून सांगितले तर बरे होईल.

एक साहित्यिक म्हणून त्यांनी लिहीलेले महाराष्ट्र गीत (१९२७)आपल्याला पुरेसे वाटत नसेल तर याबद्दल अधिक माहिती मिळताच आपल्याला कळवण्यात येईल. कोल्हटकरांनी परदेशप्रवास केल्याचा (तिथे राहून पुस्तके लिहीणे तर सोडाच!) त्यांच्या जीवनपटात उल्लेख नाही.