विनायक, दीर्घकालीन प्रतिबंधक उपाययोजनांवर भर देण्याचेच प्रयोजन आहे.

पेठकरसाहेब, ह्या रोगाची आणि त्याच्या उपायांचीही अवस्था 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' अशी आहे. लेखमालेच्या प्रगत ट्प्प्यांवर ह्याचा उलगडा होणारच आहे.

अभिजीत, मी तुमच्याशी शंभर टक्के सहमत आहे.

शीलादेवी, नमस्कार, हे लेखन निराधार नाही. बखरनुमा आहे. ह्या लेखनमालेच्या आधारे 'सम्यक जीवनशैली परिवर्तनास' सामान्यजनांनी सिद्ध व्हावे, कर्मठपणे ते आचरावे आणि हृदयरोगच नव्हे तर इतरही अवनतीकारक रोगांना आपल्यापासून दूरच ठेवण्यात यश मिळवावे अशी माझी अपेक्षा आहे.

श्रेयअव्हेरः ही लेखमाला संदर्भलेखन नाही. ती औषधोपचार मार्गदर्शक सल्ला देणारी लेखनमालाही नाही. माझी तशी वैद्यकीय पात्रता नाही. हे इथेच नमूद केलेले बरे.