भाग - ५ मध्ये निरवानिरव करताना कोल्हटकरांनी असे म्हटले आहे की भारतीयांमध्ये गुण आहेत या गुणांचा राष्ट्रीय गुण म्हणून काही उपयोग नाही. त्याआधी त्यांनी इतरही सत्यनिष्ठेसारखे गुण आमच्यात नाहीत हे इंग्रजांची मोठी रेघ काढून अधोरेखित केले आहे. त्याविषयी मनोगतावर पुरेसा संवाद चालूच आहे. मला असे वाटते की सत्यप्रियता हा गुणही भारतीयांच्या वर उल्लेख केलेल्या काटकसरपणा, वैवाहिक कर्तव्यनिष्ठा आदी गुणांच्याच माळेत जाउन वसतो.
असो... सकारात्मक दृष्टीकोनातून चर्चा पुढे चालू ठेवण्याच्या हेतूने कोणते गुण राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने हिताचे आहेत हे पहावयाचे झाले तर खालील ३ प्रमुख गोष्टी सुचतात... नव्हे तर जगाने मान्य केलेल्या आहेत.
इतरही यादी वाढविता येइल, मात्र वरील गोष्टींचा त्यांत सिंहाचा वाटा असेल हे नक्की.
कोल्हटकरांनी खोडसाळ लिखाण केले, किंवा दबावाखाली केले हे म्हणणे कलहास कारण होउ शकते. म्हणून तशी शक्यता वादासाठी बाजूस ठेउ या. मात्र ते केले तर दुसरी शक्यता उरते की हा राष्ट्रीय गुण, येथील समाज ह्या साऱ्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न ह्या महान लेखकाच्या बराचसा आवाक्याबाहेर गेलेला आहे. हे ही नाकारणे मात्र अवघड होउन बसते.