आमच्या महाविद्यालयातील एक प्राध्यापक एन. आर. आय. चा लॉन्ग फ़ॉर्म 'नॉन रिक़्वायर्ड इंडियन' असा करित असत. त्यांचे म्हणणे असे होते की उच्च शिक्षण घेऊन केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी काही लोक देश सोडून निघून जातात. त्यात राष्ट्र 'त्याग' करणे या खेरिज त्यागाची भावना काही नसते. भारतात सर्व गोष्टी कश्या व किती खराब आहेत, आमच्या सारख्या प्रज्ञावंताना त्या भूमित त्यामुळे कशा सन्धी नाहीत, कसा भ्रष्टाचार आहे, आणि हे सगळे आपल्याला पटत नाही म्हणून आम्ही देश सोडला असे साधारणतः हे लोक समर्थन करतात असे आमचे प्राध्यापक म्हणत!

मग जर देशासोबत काही लोकांनी अशी राष्ट्रत्यागाची [ राष्ट्राचा त्याग - षष्ठी तत्पुरूष :) ] भावना बाळगली तर त्या देशातील लोकांनीही अश्या त्यागी लोकांचा त्याग करायला नको का? मग भले ते कितिही विद्वान असोत....!

त्याचमुळे कदाचित "संघ" परभारतियांना "हिन्दु" स्वयंसेवक सन्घाचे सदस्यत्त्व देतो ... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाही !

त्यामूळे पोटशूळ कोणाचा ... "डॉक्टरां"ना विचारावे लागेल.