आपल्याकडुन ही अपेक्षा नव्हती.
आपल्याकडुनच हे लिहिले गेले आहे हे पुन्यांदा तपासुन पाहिल्यावर मी चमकलोच.
खरे सांगु का, एक समतोल बुद्धीचा मनोगती म्हणुन मला आपल्याविषयी नितांत आदर आहे. पण आपला हा प्रतिसाद नक्कीच खटकला.
आपल्याला तो मिळावा व आपलेही लेख छापले जावेत, शंभर वर्षांनी देखील वाचले जावेत, आपली जन्मशताब्दी साजरी करण्याची बुद्धी भावी साहित्यिकांना व्हावी, आपल्याला देखील वि. स. खांडेकरांपेक्षा श्रेष्ठ शिष्यवृंद मिळो यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना.
आपले वरील उदगार निश्चितच अनावश्यक, आगाऊ व विषयांतर करणारे वाटतात.
शंभर वर्षांनी लेख वाचले जातात म्हणुन ती व्यक्ती थोर? वि. स. खांडेकर शिष्य आहेत म्हणुन ती व्यक्ती थोर? काही साहित्यिक जन्मशताब्दी साजरी करतात म्हणुन ती व्यक्ती थोर? महान असण्याच्या ह्या कसोट्या आहेत काय? असे असेल तर मीही यांची तजवीज आत्तापासुनच करावी म्हणतो. आपण काय म्हणता?
(उद्विग्न) एक_वात्रट